वटवृक्ष मंदिर परिसर व न्यासाचे कार्य पाहून भारावलो – अजीत चव्हाण
झी २४ तास न्यूज चॅनलचे मा.संपादक तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी व्यक्त केले

वटवृक्ष मंदिर परिसर व न्यासाचे कार्य पाहून भारावलो – अजीत चव्हाण

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८/४/२३) – मी व माझे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षापासून हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. येथील वटवृक्ष मंदिर समितीचे कार्य मंदिर समितीच्या विकासातून स्पष्ट दिसत
असल्याने मंदिर परिसर व न्यासाचे कार्य पाहून आपण भारावलो असल्याचे प्रतिपादन
झी २४ तास न्यूज चॅनलचे मा.संपादक
तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी झी २४ तास न्यूज चॅनलचे मा.संपादक तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण व पुण्याचे उद्योगपती सागर ताकवले कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी अजीत चव्हाण यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, विपूल जाधव व स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – अजित चव्हाण व सागर ताकवले कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिर कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
