पानमंगरूळ ता. अक्कलकोट येथील जळीत ग्रस्त कुटुंबाला एम.के.फाउंडेशनच्या वतीने मदत.
एम.के.फाउंडेशन चे सामाजिक बांधिलकी

पानमंगरूळ ता. अक्कलकोट येथील जळीत ग्रस्त कुटुंबाला एम.के.फाउंडेशनच्या वतीने मदत.

आत्ता पर्यंत जिल्ह्यातील अनेक जळीत कुटुंबाना मदतीचा हात.

सोलापुर :
अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथील अंबण्णा उडासे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. यात अनेक किमती वस्तू भस्मसात झाल्या. दरम्यान याची माहिती समजताच एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी या कुटुंबास तातडीने आवश्यक मदत केली. शनिवारी पीडित कुटुंबाला फाउंडेशनच्या वतीने संसार उपयोगी साहित्यांची मदत करण्यात आली. आतापर्यंत अनेक जळीत कुटुंबास फाउंडेशनच्या वतीन मदत करण्यात आली आहे.

पानमंगरूळ येथील जळीतग्रस्त कुटुंबाला मदत करून एम.के.फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जळीत ग्रस्तांच्या वेदना भयंकर असतात. संपूर्ण घर आणि संसार उद्ववस्थ झालेलं असतं. संसार पुन्हा उभ करण्याच आव्हान कुटुंबासमोर असते. अश्या अडचणीत असणाऱ्या जळीत कुटुंबाच्या मदतीला आमची फाउंडेशन नेहमी तत्पर असते. घटनास्थळी कोणतीही जीवित हानी झाली नाही, याचे समाधान असल्याचे मत संस्थापक महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थापक महादेव कोगनुरे यांच्यासह काशिनाथ मुली, डॉ कांतू करजगी, शिवानंद बोळेगाव, चंद्रकांत देशेट्टी, महादेव गौडगाव, सिद्राम मंगरुळे, तुकाराम उंडासे, पंडित उंडासे, तुकाराम पुजारी, गजानन परीट, रतन राजपूत, लक्ष्मण कोळी, समर्थ गब्बर यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालक ग्रामस्थ उपस्थित होते.
