गावगाथा

सोलापूर व लातूर जिल्ह्यासाठी सौ. रेखा सोनकवडे यांची जिल्हा प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती

निवड नियुक्ती

सोलापूर व लातूर जिल्ह्यासाठी सौ. रेखा सोनकवडे यांची जिल्हा प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर प्रतिनिधी :
ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी ग्रामीण विकास मिशन भारत (महाराष्ट्र राज्य) यांनी सोलापूर व लातूर जिल्ह्यांच्या जिल्हा प्रकल्प अधिकारीपदी सौ. रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण विकास मिशन भारताचे प्रमुख श्री. अधिकराव जगताप देशमुख यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य प्रकल्प समन्वयक गीतांजली कुलकर्णी-मोहिते, व्यवस्थापकीय संचालक दादासाहेब पवार, संचालक अंकुश देशमुख, कार्यकारी संचालक योगेश खोपडे आणि प्रकल्प संचालक (पश्चिम) नितीन पाटील यांच्या सहकार्य व विश्वासातून करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण विकास मिशन भारत “अपना साथ, अपना विकास” या संकल्पनेवर आधारित कार्य करत असून ग्रामविकास, कृषी विकास, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, जलव्यवस्थापन, कौशल्य विकास आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत काम करत आहे.
मिशनच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण, महिला बचत गटांना प्रोत्साहन, खाद्यपदार्थ निर्मिती, सुरक्षा प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, पीक कार्यशाळा, सिंचन व जलव्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया उद्योग, शेडनेट व पॉलीहाऊस शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती तसेच हवामान बदलानुसार पीक लागवड यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत.
याशिवाय आरोग्य जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, योग प्रशिक्षण, रक्तदान शिबिरे, बाल आरोग्य तपासणी, शालेय साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रम, पोषण आहार केंद्र, जलसंधारण, पाणंद रस्ते, वृक्षारोपण, सौर ऊर्जा, संगणक साक्षरता, वाचनालये, विरंगुळा केंद्रे आणि वृद्धाश्रम सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्यही मिशनकडून करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना ग्रामीण विकास मिशन भारताचे प्रमुख श्री. अधिकराव जगताप देशमुख यांनी महाराष्ट्रात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून बेरोजगारी कमी करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, महिला-पुरुष आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी मिशन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्रकल्प समन्वयक गीतांजली कुलकर्णी-मोहिते यांनी महिलांना स्वावलंबी बनविणे, घरगुती उद्योगांना चालना देणे तसेच शेती, शिक्षण, आरोग्य, पाणी व वीज यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या उपलब्धतेसाठी मिशन कार्यरत असल्याचे नमूद केले.
नियुक्तीनंतर सौ. रेखा सोनकवडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सोलापूर व लातूर जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायतींनी ग्रामीण विकास मिशन भारताशी जोडून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. इच्छुक ग्रामपंचायतींनी अधिक माहितीसाठी 9405239310 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
सौ. रेखा सोनकवडे यांच्या नियुक्तीबद्दल मिशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button