श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी न्यासाच्या कार्याच्या माध्यमातून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नाव सातासमुद्रापार — माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी न्यासाच्या कार्याच्या माध्यमातून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नाव सातासमुद्रापार — माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू


पुणे प्रतिनिधी-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी न्यासाच्या कार्याच्या माध्यमातून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नाव सातासमुद्रापार झाल्याचे मनोगत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट पुणे येथे झाली. या भेटी प्रसंगी सुरेश प्रभू यांचा सत्कार न्यासाच्या वतीने जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची मूर्ती, कृपावास्त्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेश प्रभू हे बोलत होते.
दरम्यान न्यासाची कार्याची माहिती सुरेश प्रभू यांनी घेऊन आस्थेने चौकशी केली व अन्नछत्र मंडळात श्रींचा महाप्रसाद घेण्यासाठी लवकरच येऊ असे यावेळी प्रभू यांनी आवर्जुन सांगितले.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद जोशी, जलतज्ञ अनिल पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय वाडकर, शिरीष मावळे (काका), अटल वास्तू भारतचे सुनिल जोशी, बाळासाहेब देसाई-कुलकर्णी(बबलादकर), रोहित खोबरे, लाला राठोड, संतोष भोसले, स्वामीनाथ गुरव, मैनोद्दीन कोरबू, सरफराज शेख, गणेश भोसले, प्रशांत शिंदे, संतोष माने आदिजन उपस्थित होते.
*चौकट- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा-*
पुणे स्थित शिरीष मावळे (काका) हे जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी असून, शिरीष मावळे यांचे पिताश्री स्व.शिवाजीराव मावळे हे पुणे महानगरपालिकेचे सन १९६८ साली शिवसेनेचे प्रथम नगरसेवक होते. ही आठवण आवर्जुन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी उपस्थितांना करून, शिरीष मावळे यांची आस्थेने चौकशी केली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देताच उपस्थित आवाक झाले.
