अक्कलकोटच्या सुदर्शना नांदवटे (चौरे ) मॅडमचे स्पर्धेत दुहेरी यश
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा २०२४ - २५

अक्कलकोटच्या सुदर्शना नांदवटे (चौरे ) मॅडमचे स्पर्धेत दुहेरी यश

सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा २०२४ – २५ मध्ये अक्कलकोट तालुक्यातील अनेक खेळाडूंनी भाग घेतला होता . गेल्या वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जिल्हा परिषद मुलींची शाळा शिरवळ , तालुका अक्कलकोट येथे कार्यरत असलेल्या उपशिक्षिका सौ .सुदर्शना दिगंबर नांदवटे ( चौरे )यांनी कॅरम स्पर्धेमध्ये एकेरी मध्ये प्रथम क्रमांक व दुहेरी मध्ये दुसरा क्रमांक पटकावून आपल्या तालुक्याची शान वाढवली . मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब व उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम व शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब यांनी गोल्ड मेडल ,सिल्व्हर मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार केला . नांदवटे मॅडमचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे साहेब ,विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी साहेब ,केंद्र प्रमुख इंद्रसेन पवार साहेब यांनी अभिनंदन केले .
