*मराठी वाचनसंस्कृती वाढीसाठी वृत्तपत्र स्टाॅलवर प्रेरणादायी छत्रीचे अनावरण*
तरुण व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी अभिनव उपक्रम
मुंबई : मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आणि तरुणाई व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने लोअर परळ येथील वृत्तपत्र स्टॉलवर “मराठी वाचूया, मराठी बोलूया, मराठी अभिजात जपूया!” अशा प्रेरणादायी घोषवाक्यांनी सजलेली भव्य छत्री उभारण्यात आली.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त मा. जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे अनावरण मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता समाजसेवक डॉ. निलेश मानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाला बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधूसुदन सदडेकर, सरचिटणीस संजय चौकेकर, खजिनदार रविंद्र चिले,सल्लागार अजित सहस्त्रबुद्धे, ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस संतोष विचारे आणि उद्योजक रत्नाकर चंदन हे मान्यवर एकत्र उपस्थित होते.
या वेळी बोलताना मान्यवरांनी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मराठी वर्तमानपत्र वाचनाच्या माध्यमातून तरुण आणि विद्यार्थी वर्गाचे विचारविश्व अधिक समृद्ध होईल व त्यांच्यात मराठी भाषेबाबतचा अभिमान दृढ होईल.
त्यांनी आवर्जून सांगितले की, “विद्यार्थ्यांनी व तरुणांनी मराठी वाचली तरच भाषेची समृद्धी टिकेल!”
असा उपक्रम संपूर्ण मुंबईतील प्रत्येक वृत्तपत्र स्टॉलवर राबवावा, अशी सामूहिक अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि वर्तमानपत्र वाचनाला चालना देण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते हेच समाजातील खरे प्रचारक आणि भाषेचे शिलेदार ठरू शकतात, असा आशावादही यावेळी व्यक्त झाला.
या उपक्रमाद्वारे वाचनसंस्कृतीला नवे बळ मिळेल आणि मराठी माणसाच्या अस्मितेला अधिक व्यापकतेने स्थान मिळेल. कारण
* भाषा जपा, वाचन वाढवा, मराठी वर्तमानपत्र घरी आणा!
* भाषेचा सन्मान करायचा असेल, तर दररोज मराठी वर्तमानपत्राचे वाचन हवेच!
* मराठी वृत्तपत्र म्हणजे भाषेचा साक्षात्कार, ज्ञानाचा आधार!
* रोज वर्तमानपत्र दारी – ज्ञान, संपन्नता येई घरी!
* मराठी भाषेचा अभिमान – महाराष्ट्राची शान!
* आपली बोली, आपली शान – आपल्या मराठी मातृभाषेचा आहे सार्थ अभिमान!
* मराठी वाचूया, मराठी बोलूया, मराठी अभिजात जपूया !
“वाचा मराठी – वाढवा मराठी!” या ब्रीदवाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली. हा उपक्रम नक्कीच समाजात मराठी वाचनसंस्कृती रुजवणारा आणि मातृभाषेचा गौरव करणारा ठरेल.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!