श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार शिवशरणप्पा सुरवसे यांना प्रदान.
पुरस्कार वितरण सोहळा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार शिवशरणप्पा सुरवसे यांना प्रदान.

वागदरी — अक्कलकोट तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे यांनी
अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील नाभिक समाज बांधवांना एकत्र करण्याचा महत्त्वपूर्ण काम सुरवसे यांनी केले आहे.तालुक्यातील सर्व गावातील समाज बांधवांची महिती गोळा करून एका हजार जनगणना पुस्तक छापून वागदरी येथे एक हजार समाज बांधवांच्या उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.तसेच
तालुक्यातील गरीब सलुन दुकानदारांना जिल्हा सेस फंडातून 25 सलुन खुर्ची मिळबून दिले ,तसेच पंचायत समिती कडून पिको- फॉल मशीन सुध्दा मिळवून दिले.दहिटणे गावातील श्री गजानन काळे यांचे घराला आग लागून घरातील सर्व वस्तू जळाले होते, त्या जळीत कुटुंब 27000 हजार रुपये व किराणा माल मदत मिळवून दिले. श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले.
सुरवसे यांनी सामाजिक कार्य केल्याबद्दल अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ गुरूपौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त मा.जन्मजयराजे भोसले व अमोलराजे भोसले साहेब उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणीजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी त्यांचे मित्र परिवार त्याचं कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते व महाराष्ट्र नाभिक महामंडळ पक्षीम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन विभुते सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष भागवत विभूते कर्मचारी तालुका अध्यक्ष सुभाष सुरवसे सर अक्कलकोट शहर अध्यक्ष लक्ष्मण विभुते तालुका युवक अध्यक्ष श्रीशैल सुरवसे समाज पंच प्रभाकर सुरवसे सोमनिग सुरवसे उपाध्यक्ष राजेश कोरे खजिनदार प्रवीण राऊत सचिव महेश सुरवसे नागेश कोरे शिलशिद्ध राऊत संजय माने मल्लिनाथ विभूते मलु माने निगप्पा कोरे महिला तालुका अध्यक्ष अनुराधा सुरवसे महिला युवक अध्यक्ष भाग्यश्री काळे सुनंदा लोखंडे प्रियंका माने नागेश सुरवसे स्नेहा सुरवसे उपस्थित होते
