गावगाथाठळक बातम्या

Navindagi : गुरुपौर्णिमेनिमित्त नाविंदगी जिल्हा परिषद मराठी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning    

नाविंदगी (प्रतिनिधी): दप्तरा विना शाळा या उपक्रमांतर्गत तसेच गुरूपौर्णिमेचा औचित्य साधून आज नाविंदगी जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकर चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाविंदगी मठाचे मठाधिपती श्री.108 ष.ब्र शिवयोगी शिवाचार्य हिरेमठ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

या कार्यक्रमात शिवयोगी शिवाचार्य हिरेमठ महाराज यांचा सत्कार नागणसूर केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे यांनी शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि अभिनव प्रेरणादायक विचार हे पुस्तक देऊन केला. केंद्रप्रमुख  शिंदे यांचा सत्कार बसवराज म्हेञे यांनी केला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून भीमाशंकर चिवडशेट्टी यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 1600 रुपयांच्या वह्या वाटप केल्या. त्या अनुषंगाने भीमाशंकर चिवडशेट्टी यांचा सत्कार शिवयोगी शिवाचार्य हिरेमठ महाराजांनी शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन केला . तसेच सिद्धाराम अतनूरे यांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला .

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

शिक्षक खोसे यांचा  चिरंजीव गजानन गुणवंत खोसे याच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना सर्व इयत्तांचे इंग्रजी शब्दार्थ संग्रहाचे वाटप करण्यात आले. 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

तसेच, शिक्षक जाधव यांची कन्या कु. अनन्या प्रवीणकुमार जाधव हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश प्रायमर हे पुस्तक वाटप करण्यात आले.

 

      यानंतर केंद्रप्रमुख शिंदे यांनी शालेय जीवनामध्ये गुरूंचे स्थान या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले . सिद्धाराम अतनूरे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत खोसे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाडेद केले. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शिरा वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षक सुनील राठोड, कन्नड शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक गुरुनाथ नरूणे  आणि हुळ्ळे  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button