गावगाथा

*सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार*

*मुंबई वृत्तपत्र लेखक संघाकडून सुवर्णधनचा गौरव*

*सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार*

*मुंबई वृत्तपत्र लेखक संघाकडून सुवर्णधनचा गौरव*

मुंबई / सोलापूर : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये, संपादित केलेल्या अंकाची वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून, ‘ सुवर्णधन ‘ ची आवाजकार मधुकर पाटकर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षीच्या ष्णमासिकाच्या पहिल्या अंकास आवाजकार मधुकर पाटकर यांच्या नावे , सुवर्णधन दिवाळी विशेषांकास गौरविण्यात आले आहे. धुरु हॉल ट्रस्ट ,दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे , कामगार नेते दळवी, लेखक नितीन आव्हाड, प्रमुख पाहुणे पत्रकार सचिन परब ए.आय. चे मार्गदर्शक भानुदास साटम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्पर्धेसाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इंदोर, शिकागो, सिंगापूर येथून एकूण १७३ दिवाळी अंक आले होते. यातून सुवर्णधनची निवड करण्यात आली. सुवर्णधनला सन्मानित करणारा हा तिसरा पुरस्कार आहे. प्रथम अंकास स्वदेशी भारत राज्यस्तरीय पुरस्कार, दुसऱ्या वर्षीचा कोकण मराठी साहित्य परिषद,गोवा यांच्याकडून सन्मानित केले आणि हा तिसरा बहुमानाचा पुरस्कार आहे. यावर्षी विषय होता. अभिजात मराठी भाषेची स्थिती गती. महाराष्ट्र, भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच विविध क्षेत्रातील मराठीची काय स्थिती आहे व समस्या कोणत्या आहेत त्यावर उपाय योजना कशी व काय करावयाची यांचे संशोधनात्मक असे तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे. हा मराठी भाषेच्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून मार्गदर्शक व उपयुक्त ग्रंथ ठरतो आहे.
सुवर्णधनची संपादक समिती व मार्गदर्शक समिती तसेच लेखक – वाचकांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून सुवर्णधांचा उत्कृष्ट अंक परीक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे .याप्रसंगी सुवर्णधन ज्ञानोपासक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चव्हाण उपाध्यक्ष योगीराज चव्हाण, मुखपृष्ठकार दिग्विजय चव्हाण , प्राचार्य विजय गुंड, संचालक डॉ. संजय गुंड, डॉ .प्रदिप औजेकर ,प्रसन्न यरगल , गावगाथाकार धोंडाप्पा नंदे , वृत्त निवेदक शिवाजी भोसले, जय गुरुदेव,गौडगावचे लोकरे तात्या, संपादक प्रकाश जडे, कवी राजेंद्र भोसले , काॅम्ब्रेड दत्तात्रय डांगे आदी मान्यवरांनी व वाचक शुभेच्छुकांनी भरभरून अभिनंदन केले.

*फोटो खाली टीप* – आवाजकार मधुकर पाटकर यांच्या नावे सुवर्णधन अंकास पुरस्कार स्वीकारताना प्रो. डॉ.सुवर्णा गुंड व व्यवस्थापक योगीराज चव्हाण. यावेळी अध्यक्ष रविंद्र मालुसरे, कामगार नेते दळवी, सचिन परब, आव्हाड इत्यादी उपस्थित मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button