गावगाथा

*लेखक हा समाज व्यवस्थेचा कणा आहे : डॉ. संदीप सांगळे*

वाचन साखळी समूहातील सदस्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संदीप सांगळे

*लेखक हा समाज व्यवस्थेचा कणा आहे : डॉ. संदीप सांगळे*

HTML img Tag Simply Easy Learning    

लेखक हा समाजातील बारकावे टिपत असतो. समाजात होणाऱ्या अन्यायावर आपल्या लेखणीने तो वाचा फोडतो. समाजव्यवस्था सुरळीत चालवण्याचे काम साहित्य करत असते. त्यामुळे लेखकाने आपली लेखणी परखडपणे चालवली पाहिजे. कारण लेखक हा समाज व्यवस्थेचा कणा आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे डॉ. संदीप सांगळे यांनी काढत वाचन साखळी समूहाच्या राज्यस्तरीय आयोजित वाचनश्री पुरस्कार, वाचन यात्री पुरस्कार आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले.
वाचन साखळी समूह, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रा. कुंडलिक कदम यांना वाचनश्री, ज्येष्ठ साहित्यिक अरुण देशपांडे यांना वाचनयात्री, तसेच या वर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन बेंडभर, अंजली गोडसे आणि ज्योती कोहळे या समूहातील सदस्यांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रकमेची पुस्तके देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक मा. एकनाथ आव्हाड, प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर, वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे, रवींद्र लटिंगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय कार्यक्रमाला जिल्हा परिषद वाशिमचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा. गुरुनाथ पाटील, हे देखील आवर्जून उपस्थित होते.
वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र लटिंगे यांनी स्वागत, योगिता मराठे यांनी सूत्रसंचालन केले. तर मनोज अग्रवाल यांनी आभार मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

*चौकट*
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा ही जगातील टॉप 11 भाषांमध्ये गणली जाते. त्यामुळे भारतीय म्हणून मराठी भाषेचा आदर करा आणि तिचे जतन करा. कारण आपली भाषा आपले जीवन समृद्ध करत असते.
– डॉ. संदीप सांगळे
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष

HTML img Tag Simply Easy Learning    

————-
फोटो, इंटरनेट, प्रकाशन
ओळ : वाचन साखळी समूहातील सदस्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संदीप सांगळे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button