अनंत चैतन्य प्रशालेतील विद्यार्थ्यांचे ” निर्भया पथकाने ” केले समुपदेशन ——
—————————————-
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य.
व कनिष्ठ महाविद्यालय,हन्नूर येथे निर्भया पथकाच्यावतीने समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या गेलेल्या या समुपदेशन कार्यक्रमात पोलीस अंमलदार ज्योती गाजरे यांनी महिलांविषयक गुन्हे , उपाययोजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावी लागणारी काळजी, गुड टच – बॅड टच, वाहतूकीच्या नियमांचे उल्लघंन केल्याने होणारे दुष्परिणाम अशा विविध विषयांसंबधी सविस्तर मार्गदर्शन केले.तर पोलीस अंमलदार मनिषा चिंचोलीकर यांनी निर्भया पथक हे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.यावेळी शाळा स्तरावर वारंवार टेहळणी करण्यासोबतच समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या व महिलांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या निर्भया पथकाच्या कार्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अशोक साखरे यांनी कौतुक केले.प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी केले तर आभार सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री. अप्पासाहेब काळे यांनी मानले.यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, व जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.या प्रशालेतील समुपदेशन कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुकासह अभिनंदन केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!