
प्रा.ललिता लवटे शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित.
गावगाथा प्रतिनिधी.

कुरनूर:अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक रत्न पुरस्कार वितरण सोहळा मंगरूळे हायस्कूल येथे उत्साहात पार पडला यावेळी अक्कलकोट येथील सी.बी खडगी महाविद्यालयातील प्राध्यापिका ललिता लवटे यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा वितरण समारंभ अक्कलकोट येथील मंगरूळे हायस्कूल येथे रविवारी पार पाडला असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे,अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे उपाध्यक्ष अशोक मम्हाणे, सुनील पुजारी प्रमुख कार्यवाहक, जिल्हाध्यक्ष अशोक खानापुरे, नंदकुमार कदम प्राचार्य मंगरूळे हायस्कूल पत्रकार मारुती बावडे,यांच्या सह आदी उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी आरबाळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिक्षकांनी व्यापक दृष्टीकोन ठेऊन काम केलं पाहिजे समाज घडविण्याचे जबाबदारी शिक्षकांवर असते त्यामुळे हा पुरस्कार नसून यापुढे काम करण्याची अधिक जबाबदारी तुमच्या वर सोपवली आहे.म्हणून आपण अधिक जोमाने काम करावं असं आवाहन यावेळी आरबाळे यांनी केले यावेळी प्रा.ललिता लवटे यांच्या वर प्रेम करणारे हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
