मोठी बातमी…! राज्यात वीज ग्राहकांना दिलासा ; प्रीपेड मीटरवर बंदी , शिवाय १० टक्के सुटही
मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता पूर्वीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे.

यामुळे ग्राहकांना दिवसा वीजवापरामध्ये १० टक्के वीज शुल्कात सूट मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरात दिली.

आ. विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक मीटर फीडरवर बसवण्यात आले आहेत. येत्या सहा महिन्यांत ते ट्रान्सफार्मरवर बसवण्यात येतील. त्यानंतर घरगुती मीटर बसवण्यात येतील. हा बदल अमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
