गावगाथा

कर्नाटक व महाराष्ट्रातील संस्कृती, संस्कार आणि धर्म हे भाषा वेगळे असले तरी समन्वयकांच्या दृष्टीने बांधव रूपाने एकच आहेत — डॉ. पुरुषोत्तम बिळीमले

कन्नड - मराठी बांधव्य' या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र

कर्नाटक व महाराष्ट्रातील संस्कृती, संस्कार आणि धर्म हे भाषा वेगळे असले तरी समन्वयकांच्या दृष्टीने बांधव रूपाने एकच आहेत — डॉ. पुरुषोत्तम बिळीमले

अक्कलकोट, दि.५ – कर्नाटक व महाराष्ट्रातील संस्कृती, संस्कार आणि धर्म हे भाषा वेगळे असले तरी समन्वयकांच्या दृष्टीने बांधव रूपाने एकच आहेत. यासाठी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने जनतेनी सुद्धा एक मनाने राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कन्नड अभिवृद्धी प्राधिकार बेंगळूर चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिळीमले यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी महाविद्यालयात कन्नड विभागाच्या वतीने पीएम उषा प्रायोजित ‘कन्नड – मराठी बांधव्य’ या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र च्या उद्घाटनप्रसंगी कन्नड अभिवृद्धी प्राधिकार बेंगळूर चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिळीमले बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, संस्थेचे सचिव सुभाष धरणे, डॉ. व्ही. एस. माळी, डॉ. आनंद जक्कण्णनवर,कल्लोळीचे डॉ. सुरेश हनगंडी , कर्नाटक साहित्य अकॅडमीचे सदस्य डॉ. मैत्रेयिनी गदिगेप्पगौडर, विजयपूरचे डॉ. मल्लिकार्जुन मैत्री, महालिंगपूरची डॉ. अशोक नरोडे,कलबुर्गी येथील केंद्रीय विद्यापीठातील कन्नड शास्त्रीय अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. बी. बी. पुजारी,संचालक ऍड. अनिल मंगरुळे, संचालिका पवित्रा खेडगी, प्राचार्य डॉ. शिवराय अडवीतोट, चर्चासत्राचे संचालक डॉ. गुरुलिंगप्पा धबाले,पीएम उषा प्रायोजितचे समन्वयक प्रा. अप्पासाहेब देशमुख, नॅक समितीचे समन्वयक प्रा. संध्या परांजपे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषण कन्नड चे विभाग प्रमुख तथा संचालक डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांनी केले. कन्नड विद्यार्थिनी अश्विनी हिटनळळी, पूजा डबरे, पल्लवी माड्याळ व नंदिनी बाजारमठ यांनी स्वागत गीत गायले.
महाराष्ट्रातील संत व कर्नाटकातील शरण यांचे विचार एकच असल्याचे सांगून डॉ. पुरुषोत्तम बिळीमले पुढे म्हणाले, मराठी व कन्नड हे दोन्ही भाषा मध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव नाही. संपर्क करण्यासाठी भाषा ही एक माध्यम आहे. कर्नाटक महाराष्ट्राबरोबरच केरळ, तामिळनाडू हे सुद्धा गडिनाड भाग आहेत. सांगली जिल्ह्यातील जत व सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मध्ये कन्नडचे प्रभाव जास्त असून सुद्धा मराठीचे संबंध चांगली आहे. भाषा संदर्भात पंढरपूरचे विठोबा कोल्हापूरची महालक्ष्मी या दोन्ही दैवत सुद्धा भाषा संदर्भात उदाहरण सविस्तरपणे दिले. गडीनाड भागात कर्नाटक शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतो त्याचा उपयोग करून घेण्याचे आव्हान सुद्धा त्यांनी बोलताना केले. मी माझ्या पदावर असेपर्यंत आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी च्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी अक्कलकोट हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भाग असून शिक्षण संस्था मध्ये कन्नड वर्ग चालविण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. यासाठी कन्नड माध्यम चालविण्यासाठी कर्नाटक शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सहकार्य करावे. यामुळे कन्नड भाषा संवर्धन करण्यासाठी हातभार लागेल. तसेच मराठी भाषा बरोबरच कन्नड भाषा जीवंत ठेवण्यासाठी कर्नाटक शासन पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
या राष्ट्रीय परिषदेत शंभर हून अधिक शिक्षक , संशोधक, विद्यार्थी, मार्गदर्शक असे उपस्थित होते.
यावेळी कन्नड अभिवृद्धी प्राधिकार बेंगळूर चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिळीमले यांच्या हस्ते कन्नड विषयातील पीएच. डी. मध्ये डॉ. शिवानंद तडवळ , नेट मध्ये चन्नम्मा कलशेट्टी व सोलापूर विद्यापीठात कन्नड भाषेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या एम.ए. मधील पूजा डबरे विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आले.यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, मल्लिकार्जुन मडडे , सेवानिवृत्त शिक्षक धुळप्पा भजे, भीमाशंकर सलगर, शशिरेखा सलगर व अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. गीता डिग्गे यांनी केले. डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी यांनी आभार मानले.
या परिषदेसाठी कन्नड विभागाचे शिक्षक, विद्यार्थी – विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button