स्वामी दर्शनासह भाविकांनी महेश इंगळेंच्या जीवन कार्याचीही प्रेरणा घ्यावी – लक्ष्मणराव ढोबळे
स्वामी दर्शनानंतर जेष्ठ स्वामी भक्त लक्ष्मणराव ढोबळे यांचे मनोगत व्यक्त

स्वामी दर्शनासह भाविकांनी महेश इंगळेंच्या जीवन कार्याचीही प्रेरणा घ्यावी – लक्ष्मणराव ढोबळे

स्वामी दर्शनानंतर जेष्ठ स्वामी भक्त लक्ष्मणराव ढोबळे यांचे मनोगत व्यक्त

(प्रतिनिधी अक्कलकोट,दि.०७/०३/२०२५) –
मानवी जन्माचे सार समजल्यानंतर जीवनाचे मूल्यमापन काय आहे त्याचा अर्थ आपणास उलगडतं, त्यामुळे मन भक्ती, परमार्थ, त्याग, समर्पण या गोष्टींकडे वळते. या सर्व व्याख्या येथील मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्वात आपणास नेहमीच निदर्शनास येतात. सेवा, परमार्थ या कार्यातून महेश इंगळे यांनी आपल्या परमार्थिक जीवनाचे ध्येय सार जोपासले आहे, म्हणून त्यांचे जीवन कार्य म्हणजे समर्पित जीवन कार्याचे प्रेरणास्त्रोत आहे. ते स्वामी दर्शना बरोबरच भाविकांना जीवन उपदेशकही आहे, म्हणून येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आलेल्या स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाबरोबरच मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या समर्पित जीवन कार्याची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जेष्ठ स्वामी भक्त लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी
लक्ष्मणराव ढोबळे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी ढोबळे बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, विपुल जाधव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप चव्हाण, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – लक्ष्मणराव ढोबळे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
