३० जूनच्या आत सर्व कारखान्यांनी ऊस बिल जमा करावे
प्रत्येक सोलर कंपन्यांनी किमान एक लाख झाडे लावा अन्यथा ३० जूनला रास्ता रोको आंदोलन करणार : आनंद बुक्कानुरे
अक्कलकोट — गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिल थकीत ठेवणाऱ्या कारखाना विरुद्ध आज अक्कलकोट तहसीलदार कार्यालय येथे प्रशासन व कारखानदारांच्या लक्ष वेधण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली अनोखा जागरण गोंधळ घालून शेतकऱ्यांनी तहसीलदार व कारखाना चेअरमनच्या नावाने अनोखा पद्धतीने बोंबाबोंब आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले.
अक्कलकोट विधानसभेतील गोकुळ शुगर धोत्री, जय हिंद शुगर आचेगाव, मातोश्री व सिद्धेश्वर यासह अनेक कारखानदारांनी ३० जून पर्यंत अक्कलकोट विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा नाही केला तर ३० जून रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचे इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिले. अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर धोत्रे यांनी वारंवार चुकीच्या तारखा देऊन दिशा बदल करत आहे.तसेच अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोलर कंपनी आल्याने मार्च एप्रिल मध्ये ४५ च्या आसपास सेल्सिअस तापमान वाढला असून सोलर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याने अक्कलकोटच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे.सोलर कंपन्यांनी मुळे वारंवार दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यापुढे कुठलेही सोलर कंपनीला परवानगी देऊ नये हे सर्व मागण्याचे ३० जूनच्या आत प्रत्येक सोलर कंपनीला किमान एक लाख झाड लावण्याची आदेश द्यावे. सध्या कार्यरत असलेले सोलर कंपन्यामध्ये फक्त स्थानिक लोकांना तरुणांना नोकरी द्यावे असे मागण्याचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी दिले. अन्यथा ऊस बिल व सोलर कंपनी विरोधात अक्कलकोट सोलापूर हायवे वर सोमवार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना बोलवून एम एस बी चौक एम एस बी समोर बायपास रोड अक्कलकोट येथे रस्ता रोको करणार आहेत. जोपर्यंत ऊस बिल देत नाही तालुक्यात सोलर कंपनीच्या मार्फत झाडे लावत नाही.तोपर्यंत रस्ता रोखून धरणार असल्याचे बुक्कानुरे यांनी सांगितले. त्यावेळी आरपारची लढाई लढणार असल्याची ठणकावून तहसीलदार यांना सांगितले. सर्व कारखान्याचे चेअरमन च्या नावाने बोंबाबोंब आंदोलन बोंब मारून अक्कलकोट तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी महांतेश हातुरे,राम जाधव, मल्लिनाथ अरवतकल, श्रीशैल स्वामी, शांतवीर कळसगोंडा, बसवराज पुजारी, हनुमंत नागुरे , स्वामीनाथ प्रचंड, गुरुनिंगाप्पा पाटील, संतोष पाटील, येल्लू करजगी, सुनील धर्मसाले,शिवानंद परीट सह सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!