गावगाथा
*मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते शिवश्री प्रविण तथा पिंटू घाडगे, सांगवी यांची निवड
निवड नियुक्ती

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते शिवश्री प्रविण तथा पिंटू घाडगे, सांगवी यांची निवड नुकतीच करण्यात आली.*

मराठा सेवा संघाचे जिल्हा व शहर कार्यकारणी पदग्रहण समारंभ व स्नेह मेळावा नुकतेच सोलापूर येथे संपन्न झाले. याप्रसंगी सदरची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष शिवश्री इंजि. प्रा. डॉ. जी.के.देशमुख यांच्या हस्ते शिवश्री प्रविण तथा पिंटू घाडगे यांना देण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा, शहर पदाधिकारी व सदस्य बहुसंख्याने उपस्थित होते. त्यांच्या निवडी बद्दल सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवश्री प्रविण तथा पिंटू घाडगे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.
