विज्ञानाची आवड गोडी निर्माण करणारे हरहुन्नरी — कृतीशील शिक्षक प्रकाश घोळसगांव सर…
कृतीशील शिक्षक

विज्ञानाची आवड गोडी निर्माण करणारे हरहुन्नरी — कृतीशील शिक्षक प्रकाश घोळसगांव सर…

वागदरी गावचे सुपुत्र कृतीशील शिक्षक प्रकाश घोळसगांव सरांच्या हटके शिकवण्याच्या अंदाजामुळे मुलांचे आवडते विज्ञान शिक्षक बनले आहेत.
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागण्यासाठी चांगले विज्ञान शिक्षक असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, सृजनशीलता वाढवण्यासाठी आणि चांगले संशोधक तयार करण्यासाठी विज्ञान शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते…
सांगवी ता. तुळजापूर या शाळेतील विज्ञान शिक्षक श्री प्रकाश घोळसगाव या शिक्षकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.सरांचा वैशिष्ट्पूर्ण उपक्रम म्हणजे परिपाठात विज्ञानाचा प्रवेश म्हणजे काय तर? गुरुजी सकाळी परिपाठाची तयारी करून घेताना दररोज नियमित पणे एका शास्त्रज्ञाचा फोटो दाखवून त्याच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाचून दाखवतात व विज्ञानातील गंमतीजमती विद्यार्थ्यांना सांगतात अतिशय रंजक पद्धतीने ते विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घेण्यास प्रवृत करतात यामुळे विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन वाढते .प्रश्न उत्तरामुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक स्मरणशक्ती वाढते.

शाळेत राबवत असलेल्या विज्ञान उपक्रमाची नोंद महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विज्ञानोत्सव यामध्ये त्यांचा अंकात छापून आला आहे.

सरांचा स्वभाव शांत असून त्यांनी यापूर्वी प्रशाला सावरगाव या ठिकाणीही अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे, NMMS विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. अनेक विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून ते नेहमी वैज्ञानिक कार्य करतात.
सरांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा…💐🌹
