गावगाथा

*श्री रामलिंगेश्वर प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा*

महिला दिन विशेष

*श्री रामलिंगेश्वर प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा*
श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर ) दि.08 मार्च 2025
जागतिक महिला दिनानिमित्त प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कर्नाटक राज्यातील गदग येथील प्रा.श्रीशैल शिंपी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचे पार्श्वभूमी व त्याची सुरवात हे विसाव्या शतकातील सुरुवातीच्या काळात युरोप व अमेरिका या देशांमध्ये कामगार चळवळी मधून निर्माण होऊन 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला दिवस होता. यामुळे 1910 च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना एक विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले. व पुढे 1917 मध्ये रशियन क्रांतीनंतर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सहमती दर्शवली व तो दिवस आपण जागतीक महिला दिन म्हणून साजरा करत असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर २१ व्या शतकात मोबाईल व टेलिव्हिजनचा जास्त वापराने संस्कृती लोप होत असल्याचे खंत व्यक्त करून विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेतील मानसशास्त्रीय टिप्स दिले.
यावेळी महिला दिनानिमित्त प्रशालेतील भगिनी सौ.अश्विनी श्रीशैल बाळीकाई, सौ.मीनाक्षी नागनाथ शेळगे , सौ. सुनंदा विठ्ठल पाटील ,यांचा सत्कार करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य सुधीर सोनकवडे म्हणाले की, काही लोक म्हणतात स्त्रीचे कोणतेच घर नसते. परंतु माझे म्हणणे आहे की ,स्त्री शिवाय कोणतेच घर नसते. जागतिक महिला दिनाच्या उपस्थित महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास नागराज पाटील, सचिन गुजा, अमर पाटील, सिद्धाराम पाटील, रेवणय्या मठपती, राजकुमार देडे, गुरुशांत बिराजदार, बाबूलाल धोडमिसे आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पट्टणशेट्टी तर आभार प्रा.शांतप्पा बगले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button