गावगाथा

*छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात* निमगाव भोगी येथे साहित्यिक सचिन बेंडभर यांचे प्रतिपादन

सचिन बेंडभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.

*छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात*
निमगाव भोगी येथे साहित्यिक सचिन बेंडभर यांचे प्रतिपादन
ता.( पुणे प्रतिनिधी )
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव भोगी येथे सप्तदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त पाच दिवसीय ज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कवितांची मेजवानीही विद्यार्थ्यांना यावेळी अनुभवायला मिळाली.
सरपंच उज्वला इचके, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पावसे, हनुमान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी भोस, मुख्याध्यापक सुभाष गागरे, माजी सरपंच उत्तम व्यवहारे, उपसरपंच लक्ष्मण सांबारे, सचिन रासकर, माजी सरपंच सुप्रिया पावसे,माजी सरपंच सचिन सांबारे, बाबासाहेब इचके, खामकर सर, रामभाऊ रासकर, माने सर, गाजरे सर, उपाध्यक्ष रेणुका राऊत, ताराबाई रासकर, उज्वला इचके, आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून त्यांनी काव्यनिर्मितीची पार्श्वभूमी समजून सांगितली. तसेच कविता कशी तयार होते? तिचे प्रकार कोणते? हे सांगत त्यांनी कळो निसर्ग मानवा, येते जगाया उभारी, आजोळ आणि मामाच्या मळ्यात या कविता विद्यार्थ्यांना गाऊन दाखवल्या. त्यावेळी सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन त्या कविता ऐकत होते. विद्यार्थ्यांनी त्यांना दाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंगल शिंदे, ज्ञानेश्वर नरवडे, मालन गायकवाड, संदीप थोरात, सुचिता सोनार आदी शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*चौकट*
विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासावे. छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, अपयश आपली पाठ सोडत नाही तेव्हा माणूस नैराश्येत जातो. अशा प्रसंगी छंद माणसाला त्यातून बाहेर येण्यास मदत करतात. खरं तर सुंदर जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला कोणता ना कोणता छंद जडला पाहिजे, म्हणजे आयुष्य सुखकर होते व त्याचा आनंद घेता येतो.
– सचिन बेंडभर
– कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे.
————-
*फोटो :*
ओळ : सचिन बेंडभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button