हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
महिला दिनानिमित्त

हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

अक्कलकोट- (प्रतिनिधी)*
*महिला सबलीकरणा करिता सतत कार्यरत असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व आधार स्तंभ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जन्मेजयराजे भोसले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले व त्यांची टिम उत्कृष्टरित्या कार्यरत आहे., जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही सर्व सखी आणि भगिनीनकरिता एक अनोखा मैत्रीचे घट्ट नाते निर्माण व्हावे यासाठी रविवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अन्नछत्र मंडळ प्रांगणातील वाहनतळ शेड मंडप येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिरकणीच्या वतीने करण्यात आले आहे.*

या विविध कार्यक्रमामध्ये मनोरंजनात्मक खेळ, प्रश्न मंजुषा, बौद्धिक खेळ, गाणे गप्पा गोष्टी आणि गेम्स, आकर्षक भेट वस्तू, टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यु गेम्स अशा अनेक कलांचा संगम असणारा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम हे मनोरमा मल्टीस्टेट सोसायटी सोलापूर चे चेअरमन शोभाताई श्रीकांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सभासदांसह अक्कलकोट पंच क्रोशीतील सर्व महिला भगिनींनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन हिरकणी संस्थेच्या वतीन करण्यात आले असून, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्वेता हुल्ले हे करणार आहेत.
