अल्पसंख्यांक समाजाच्या हक्काची चळवळ गतिमान व्हावीप्रा– हर्षदा गायकवाड
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

अल्पसंख्यांक समाजाच्या हक्काची चळवळ गतिमान व्हावीप्रा– हर्षदा गायकवाड

कल्याणशेट्टी महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

अक्कलकोट

अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना बहिष्कार भेदभाव आणि सामाजिक असमानता यासारख्या रुढी भेडसावत आहेत. त्यामुळे सामाजिक दरी निर्माण झाली आहे. त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी अल्पसंख्यांक हक्काची चळवळ उभी केली पाहिजे. ती चळवळ गतिमान देखील झाली पाहिजे. असे प्रतिपादन प्राध्यापिका हर्षदा गायकवाड यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, कार्यक्रमाधिकारी प्रा राजेश पवार, प्रा डॉ शितल झिंगाडे भस्मे, प्रा शिल्पा धूमशेट्टी, प्रा विद्या बिराजदार उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा गायकवाड म्हणाल्या की, अल्पसंख्यांक समाजाकडे विविधता आहे, त्यांच्यातील बलस्थाने ओळखून त्यांना सामाजिक प्रवाहात आणले पाहिजे, अल्पसंख्यांकांना शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सुविधा व हक्क त्यांच्यापर्यंत जाऊन सांगितल्या पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी केले, सूत्रसंचलन प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले तर आभार प्रा मनीषा शिंदे यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
विद्यार्थ्यांनी घेतली अल्पसंख्यांकांसाठी शपथ
अल्पसंख्यांकांचे अधिकाराचे संरक्षण करून त्यांना शासकीय सुविधांची माहिती करून देणे तसेच त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याची शपथ राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी घेतली.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अल्पसंख्यांक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्राध्यापिका हर्षदा गायकवाड व मान्यवर..