गावगाथा

*दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत महिला दिन उत्साहात साजरा*

महिला दिनानिमित्त विशेष

*दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत महिला दिन उत्साहात साजरा*
*(अक्कलकोट तालुका प्रतिनिधी)दि ८-* अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती कावेरी झळकी हे होती.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व महिला पालकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रम मुलांच्या स्वागत गीतांने कार्यक्रम सुरुवात केली.या प्रसंगी मल्लमा मोडलकर,कोगनूर,अल्लापूर, आळंद,बिल्लाड,सिन्नूर,शेख या आदर्श महिलांच्या सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एचपी कंपनीचा प्रिंटर व स्कॅनर भेट म्हणून प्रदान केला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, उपाध्यक्ष हनुमंत कलशेट्टी, शिक्षण तज्ञ तथा रिपाइं सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,समिती सदस्य मिहीदीमियाँ जिडगे,श्रीशौल चिंचोली,शिक्षक सुशांत गद्दी (सर),पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर शंकर कुंभार,व्यापारी चन्नू हावशेट्टी,आयटी कंपनीचे मॅनेजर पदावर कार्यरत असलेले शिवलिंग झळकी,शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ.अंजली गुंजोटे मॅडम, सह शिक्षक सुहास पवार सर,पोमू राठोड सर,संजीवकुमार बेंनिसुर सर आणि रविकुमार कोरचगाव सर आदी सह पालक विध्यार्थी व ग़्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख सुरेश शेटगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.पालक व ग़्रामस्थांच्या सहकार्य व मार्गदर्शन हा शाळेच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळेल,असा विश्वासनीय मत उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button