अन्नछत्र मंडळास धुळे येथील स्वामी भक्त हेमंत चौधरी यांनी ताशी एक हजार चपाती मेकर मशीन भेट
अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अन्नछत्र मंडळास धुळे येथील स्वामी भक्त हेमंत चौधरी यांनी ताशी एक हजार चपाती मेकर मशीन भेट

अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे सुरु असलेल्या कार्यावर प्रेरित होऊन धुळे येथील स्वामी भक्त हेमंत चौधरी यांनी ताशी एक हजार चपाती मेकर मशीन न्यासाला दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.*

दरम्यान मशीनचे पूजन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी न्यासाच्या वतीने श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन हेमंत चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी न्यासाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. संतोष खोबरे, मनोज निकम, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सौरभ मोरे, नामा भोसले, अतिश पवार, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, संभाजीराव पवार, सागर पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, गोविंदराव शिंदे, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, धनंजय निंबाळकर, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, शिव स्वामी, प्रकाश लोंढे, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, रोहित कदम, संभाजीराव पवार, रमेश अरबाळे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
