*पोषण आहाराचे तालुकास्तरीय सुसंवाद सभा संपन्न* प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुक्यातील 50 शाळा सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) शासन नियुक्त सोसायटी फॉर एज्युकेशन इन व्ह्याल्यु अँड अँक्शन (सेवा) छत्रपती संभाजीनगर या संस्थेकडून करण्यात आले होते .
त्या अनुषंगाने शाळा स्तरावर तपासणी दरम्यान आढळलेल्या मुद्द्यांचे वाचन करुन त्यावर संवाद साधण्यासाठी तालुकास्तरीय जनसुनावणी मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आली असून यामध्ये विविध मुद्यांवर सखोलपणे चर्चा करुन योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत सूचना देण्यात आल्या.
सदर जनसुनावणीस गटशिक्षणाधिकारी श्री.अरबाळे, अधीक्षक श्री. सोमशेखर स्वामी, श्री धडके केंद्रप्रमुख, श्री. कदम मुख्याध्यापक, श्री. पंडित गुरव, सोसायटीचे अधिकारी श्री. थोरात, श्री भोसले, श्री गायकवाड व तालुक्यातील सोशल ऑडिट झालेले सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. या जनसुनावणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अभिजीत सूर्डीकर यांनी केले.