मनीषा कुन्हाळे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
वागदरी वागदरी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेची उपक्रमशील शिक्षिका मनीषा कुन्हाळे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. आज शनिवार अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टीपर्पज हॉलमध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभामध्ये शांभवीताई कल्याण शेट्टी यांनी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित केले. अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे साहेब, मल्लय्या मठपती केंद्रप्रमुख बसवराज मुनोळी सुरेश शटकार, धडके सर, जीवराज खोबरे,आदीसहित तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वागदरी केंद्रातील मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे, शिवानंद गोगाव अनुसया कलशेट्टी,नदाफ सर, तोलन बागवान, बाबासाहेब बनसोडे, सुजाता केसुर अमोल बोराळे,नागेंद्र बिराजदार,सिद्धाराम होदलुरे, फड मॅडम,आधी सहित केंद्रातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. मनीषा कुन्हाळे मॅडम मराठी मुलांच्या शाळेत ,नावीन्य पूर्ण उपक्रम राबवून मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहे त्यांच्या कार्याच्या दखल घेऊन पंचायत समिती अक्कलकोटचे शिक्षण विभाग यांनी या वर्षाच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वागदरी केंद्रातील केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.