गावगाथा

*घोळसगाव येथे पीर महिबूब सुबहानी संदल व दीपउत्सव उत्साहात साजरा*

घोळसगाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा पीर महिबूब सुबहानी संदल व दीपउत्सव उत्साहात साजरा झाला.

*घोळसगाव येथे पीर महिबूब सुबहानी संदल व दीपउत्सव उत्साहात साजरा*

घोळसगाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा पीर महिबूब सुबहानी संदल व दीपउत्सव उत्साहात साजरा झाला.
हिंदू-मुस्लिम मिळून मिसळून हा उत्सव साजरा करीत असतात. दि. 13 रोजी पीर लालडेमशाक संदल व दि. 14 रोजी महिबूब सुबहानी संदल व 15 रोजी दीपउत्सव साजरा केला. त्यामुळे हिंदू -मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत हा उत्सव साजरा करतात. त्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य- आनंद तानवडे (मालक), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मूनाफ दिवटे, सद्दाम शेरीकर, एम आय एम तालुका प्रमुख इरफान दावना, सरपंच राजशेखर किवडे, तंटामुक्त अध्यक्ष संजय होले, सैपन सुभेदार,मूनाफ दिवटे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी कांबळे, विश्वनाथ पाटील, नागप्पा मंगरुळे, घोळसगाव सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, हे हजर होते. त्याप्रसंगी मूनाफ दिवटे, यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव पदी निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम करण्यास यशस्वी करण्यास अल्ताफ फकीर, अफसर मकानदार, अमीन फकीर, शाबोदिन नदाफ, रियाज नदाफ, हसन रेऊरे,मालिनाथ कोतले,बाप्पा पडसलगे, विरसंगपा पडसलगे, चांद फकीर, यासिन फकीर,कोंडूलाल नदाफ,बबलू मुल्ला,सैपन मुल्ला, अब्दुल मकानदार,हुसेन मकानदार, महिबूब फकीर, उस्मान फकीर, सोहेल फकीर, प्रशांत आलुरे, अजमेर नदाफ, लालशा मकानदार, अशपाक पटेल,अरिफ दिवटे, व इतर बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.
सर्व हिंदू मुस्लिम बांधवानी मिळून पीर महिबूब सुबहानी संदल व दिपउत्सव साजरा केला..

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button