गावगाथा

भारताची आध्यात्मिक महती जगात सर्वश्रेष्ठ – स्वामी रीतावन भारती

स्वामींचे दर्शन घेवून व्यक्त केले मनोगत)

भारताची आध्यात्मिक महती जगात सर्वश्रेष्ठ – स्वामी रीतावन भारती

(स्वामींचे दर्शन घेवून व्यक्त केले मनोगत)

(अक्कलकोट, दि.१६/१०/२४) – भारताची आध्यात्मिक महती फार मोठी असून जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे मनोगत हरिद्वार येथील
स्वामी रीतावन भारती साधक ग्राहक आश्रम चे प्रमुख स्वामी रीतावन भारती यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळेे, प्रथमेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी स्वामी
रीतावन भरती बोलत होते. पुढे बोलताना स्वामी रीतावन भारती यांनी अमेरिकेत आश्रमातअसताना ३ वर्षांपुर्वी स्वामी समर्थांनी आपल्या स्वप्नात येवून साद दिल्याने प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घेण्याचे कुुतूहल आपणास लागून होते. त्या अनुशंगाने आज प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घेेतल्याने समाधान लाभले असल्याचे सांगीतले. भारतीय संस्कृती व येथील प्राचीन आध्यात्मिक महती व येथील नागरिकांचे प्रेेमळ वागणे हे अक्कलकोट येथेेही अनुभवता आल्याने आपण भारावून गेलो असून भारतासह अक्कलकोटचे नागरीक खुप भाग्यवान असून येथील आठवणी आयुष्यभर आपल्या स्मरणात व स्वामींचे आशिर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहतील असे मानस व्यक्त केले. या प्रसंगी
नागणसूर येथील तुप्पीन मठाचे अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांचाही महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक महेश हिंडोळे, प्रदीप पाटील, समर्थ धनशेट्टी, राजेंद्र पाटील, कांतु धनशेट्टी, सुनील दसले, योगेश स्वामी, प्रकाश पाटील ,वटवृक्ष मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, संजय पवार, श्रीशैल गवंडी आदिसह बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते उपस्थित होते.

फोटो ओळ = स्वामी रीतावन भारती, अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, महेश हिंडोळे व इतर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button