स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामी दर्शनाचा ध्यास बाळगल्याने लंडन ते अक्कलकोट वारीचा संकल्प पूर्ण झाला – मि.बास्टीयन

मिस्टर बास्टीयन, मिस ब्रिजीड, सुचिता पाटील यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामी दर्शनाचा ध्यास बाळगल्याने लंडन ते अक्कलकोट वारीचा संकल्प पूर्ण झाला – मि.बास्टीयन

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२/६/२३) –
(शब्द संकलन – श्रीशैल गवंडी) – 
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या प्रचितीचे नावलौकिक जगभरासह लंडनमध्येही पोहोचलेले आहे, त्यामुळे भारतीय आध्यात्म व स्वामी भक्ती, स्वामी समर्थांचे दर्शन याचा ध्यास निर्माण झाला होता. हा स्वामी दर्शनाचा ध्यास घेतल्यानेच आपला लंडन ते अक्कलकोट वारीचा संकल्प पुर्ण झाला असे मनोगत युनायटेड किंग्डम लंडन येथील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे कर्करोग निदान संशोधक
मिस्टर बास्टीयन, मिस ब्रिजीड यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी मिस्टर बास्टीयन बोलत होते. पुढे बोलताना बास्टीयन यांनी स्वामी दर्शनाचा ध्यास एकदा मनी लागला की आपण जगात कोठेही असू द्या स्वामी अगदी कळकळीने आपल्याला त्यांचे दर्शन देण्याकरिता अक्कलकोटी बोलवतात. त्याची प्रचिती आज वटवृक्ष मंदिरात उभे राहून स्वामींचे दर्शन घेत असताना स्वामींच्या नयनातून आली असल्याचे सांगून सर्व अक्कलकोटवासी हे खूपच भाग्यवान आहेत, कारण त्यांना नियमीतपणे स्वामींचे दर्शन घडते असेही मनोगत व्यक्त केले. आज स्वामी दर्शनानंतर वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांनी जो आमचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन मान सन्मान केला त्यामुळे भारतीय संस्कृती किती सुंदर व महान आहे याची आपणास जाणीव झाली असून याचे वर्णन आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत अवश्य करणार असल्याचे मनोगतही व्यक्त केले. या वेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सुचिता पाटील, श्रीकांत मलवे, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते

फोटो ओळ – मिस्टर बास्टीयन, मिस ब्रिजीड, सुचिता पाटील यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button