गावगाथा

भुरिकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन व वाचन स्पर्धा संपन्न..

पुस्तकांशी मैत्री करा जीवनात यशस्वी व्हाल - प्रा.चंद्रकांत पोतदार*

भुरिकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन व वाचन स्पर्धा संपन्न..

पुस्तकांशी मैत्री करा जीवनात यशस्वी व्हाल – प्रा.चंद्रकांत पोतदार*

वागदरी — भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जि प प्राथमिक मराठी केंद्र शाळा भुरीकवठे येथील प्रमुख चव्हाण गुरुजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी जि प प्राथमीक मराठी शाळेचे शिक्षिका शेख मॅडम संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब कलशेट्टी सचिव चंद्रकांत पोतदार ग्रंथापाल वंदना पोतदार सहाय्यक ग्रंथपाल संजय सोलापूर अभिषेक पोतदार शेखर स्वामी आधी जण उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव प्रा.चंद्रकांत पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेची थोडक्यात माहिती सांगितली तर नंतर उपस्थित बालकांनी विद्यार्थ्यांनी संस्थेतील उपलब्ध बालवांग्मयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. चव्हाण गुरुजी यांनी देखील आपल्या मनोगता मधून संस्थेकडील उपलब्ध 24000 ग्रंथ संपदा 75 दरमहा मासिके पाक्षिके दुमजली इमारत तीन कॉम्प्युटर पाहून संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाची आश्चर्य वाटून कौतुकही केले त्यानंतर संस्थेच्या स्वर्गीय माणिक; स्वर्गीय भाऊराव; स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र पोतदार सभागृहामध्ये विद्यार्थ्यां ची वाचन स्पर्धा घेण्यात आली 25 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना व दोन उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देण्याचे संस्थेने जाहीर केले.संजय सोलापुरे यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button