बाळासाहेबांनी स्वामी सेवेतच जीवन व्यतीत केले – सचिन किरनळ्ळी
स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्वामी सेवक कै. कल्याणराव इंगळे यांच्या ९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर सचिन किरनळी यांनी व्यक्त केले मनोगत.
स्विमिंग ग्रुप सदस्यांनी कै.कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त वाहिली आदरांजली.
(श्रीशैल गवंडी, दि.२०/३/२०२५) अ.कोट.
प्रत्येक सजीवाला जन्म मृत्यू अटळ आहे याचे भान ठेवून नश्वर मानवी जीवन दुसऱ्यासाठी कष्टत व्यतीत करणाऱ्या स्वर्गीय कल्याणराव इंगळे यांच्या व्यक्तीमत्वातच कल्याणकारी कर्म होते. कै.बाळासाहेबांनी श्री.वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान मध्ये सर्वांगीण आयुष्य स्वामी सेवेतच व्यतीत करुन आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी रुग्णालय तालुक्यातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी पॉलिटेक्निक कॉलेजची निर्मीती केली. संपुर्ण जीवन स्वामी सेवेसाठीच समर्पित केले असल्याचे मनोगत येथील प्रतिष्ठित उद्योगपती स्विमिंग ग्रुपचे सदस्य सचिन किरनळ्ळी यांनी व्यक्त केले. कै.कल्याणराव इंगळे यांच्या ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त स्विमींग ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळयाप्रसंगी कै.कल्याणराव इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सचिन किरनळ्ळी बोलत होते.
पुढे बोलताना सचिन किरनळ्ळी यांनी कै.बाळासाहेबांनी आपल्या जीवनात नगरसेवक, नगराध्यक्ष इत्यादी पदे भुषवून अक्कलकोटच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या निमित्ताने समाजसेवक स्वामी सेवक या उपाधीने त्यांच्या जीवन कार्याचे नेहमीच गौरव व्हावे या हेतूने दरवर्षी स्विमिंग ग्रुपच्या वतीने कै.कल्याणराव इंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येत असल्याचे मनोगतही सचिन किरनळ्ळी यांनी व्यक्त केले. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य प्रथमेश इंगळे, संतोष पराणे, श्रीकांत झिपरे, प्रसन्न हत्ते, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, अरविंद पाटील, शेखर आडवितोटे, चंद्रकांत सोनटक्के, बाबा सुरवसे, शैलेश राठौर, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले व अन्य उपस्थित होते.
फोटो ओळ – स्विमिंग ग्रुपचे सदस्य कै.कल्याणराव इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतरचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!