गावगाथा

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्री. समर्थ नगरी अक्कलकोट आगारासाठी नवीन दहा बसेसचे आगमन:

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लाडक्या लालपरीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्री. समर्थ नगरी अक्कलकोट आगारासाठी नवीन दहा बसेसचे आगमन:

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लाडक्या लालपरीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.

अक्कलकोट —-ब्रह्मांडनायक श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व गाणगापूरचे श्री.दत्तगुरु,तुळजापूरची आई तुळजाभवानी , पंढरीचा पांडुरंग या प्रसिद्ध देवस्थानाने वेढलेल्या आपल्या अक्कलकोटसाठी, भाविक भक्त आणि प्रवासी मायबाप यांच्या सेवेसाठी आज रोजी एसटीची कार्यशाळा असलेल्या पुणे येथील दापोडी कार्यशाळे मधून थेट अक्कलकोट आगारामध्ये दहा नवीन बसेसचे आगमन झाले आहे. आपल्या संबंध तालुका वाशियांसाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपला अक्कलकोट आगार, आगारातील कर्मचारी व अक्कलकोट वाशिम जनता नवीन लालपरीच्या आगमनाची चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत होते. मध्यंतरीच्या काळामध्ये दोन-चार गाड्यांचा अपवाद वगळता आपल्या आगारामध्ये नवीन गाड्या या येऊ शकलेल्या नाहीत.. इतर आगारातील नवीन गाड्या आपल्या बस स्टँड वरती आल्यानंतर आपणाला वाईट वाटत होतं की, आपल्या आगारांमध्ये नवीन गाड्या का येत नाहीत. पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे. आपल्या अक्कलकोट बस स्टॅन्ड चे काम हे युद्ध पातळीवरती भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये आपल्या आगारामध्ये नवीन 10 बसेसचे आगमन झालेले आहे.खरोखरच ही खूप आनंदाची आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची देखील गोष्ट आहे. जास्तीत जास्त लालपरी आपल्या आगारामध्ये याव्यात आणि स्वामी भक्तांची व तालुका वाशीय जनतेची सेवा घडावी या कामी ज्यांनी पाठपुरावा केले असे मायबाप प्रवासी, आपले कर्मचारी आणि या सर्वांच्या प्रयत्नांची आणि प्रश्नांची दखल घेऊन या बसेस आपल्या आगारामध्ये यावे म्हणून सर्व बाजूंनी प्रयत्नांची पराकाष्टा करून नवीन दहा लालपरी बसेस मिळवून दिलेल्या आपल्या अक्कलकोट तालुक्याचे लाडके आमदार श्री.सचिनदादा कल्याणशेट्टी साहेब यांचे देखील खरोखरच मनापासून खूप खूप आभार .
आज आपल्या अक्कलकोट आगारामध्ये ज्या नवीन लालपरी दाखल झाल्या आहेत, त्यांचे पूजन आपल्या अक्कलकोट आगाराचे कार्यशाळा अधीक्षक श्री. कांबळे साहेब व वाहतूक निरीक्षक श्री. रोडगे साहेब यांच्या हस्ते व वाहतूक नियंत्रक श्री. खसकी साहेब अक्कलकोट आगारातील असंख्य कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
आता या ज्या नवीन लालपरी आपल्या आगारांमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आपल्या आगारातील कर्मचाऱ्याना देखील अति आनंद झालेला आहे. या लाल परींची आपण सारे मनापासून काळजी घेऊया, तिची स्वच्छता राखूया, तसेच आपण अक्कलकोट आगारातील सारे अधिकारी कर्मचारी मनापासून काम करून, एकमेकांना साथ देऊन, आपल्या अक्कलकोट आगाराच्या उत्पन्नामध्ये भर घालून आपल्या आगाराचे नाव महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी नेऊ या सदिच्छा….🙏🙏🌷🌷

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button