मराठा सेवा संघ अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहूल शिंदे यांची निवड.
मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते राहुल शिंदे यांचा सन्मान.

मराठा सेवा संघ अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहूल शिंदे यांची निवड.

- मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते राहुल शिंदे यांचा सन्मान.
(श्रीशैल गवंडी, दि.२०/०३/२०२५) अ.कोट.
येथील मराठा सेवा संघाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व मराठा समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी राहुल शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना राहुल शिंदे यांनी आपण नेहमी मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सक्रिय रहावे म्हणूनच सेवा संघाने आपणावर ही जबाबदारी सोपवली आहे. ती आपणा सर्वांना सोबत घेऊन पार पाडू हीच सदिच्छा व्यक्त करून स्वामी चरणी प्रार्थना करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब मोरे, संजय पवार, तम्मा शेळके, अतुल जाधव, डॉ.बिराजदार, विपूल जाधव, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – राहूल शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, तम्मा शेळके, आत्माराम घाटगे, अतुल जाधव, डॉ.बिराजदार व अन्य दिसत आहेत.
