गावगाथाठळक बातम्या

बोअरवेलसाठी शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत

पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Agricultural Revolution Scheme) अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

आता याच योजनेअंतर्गत बोअरवेलसाठीही (Borewell) अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी ५०,००० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

 

HTML img Tag Simply Easy Learning    

पाणीटंचाईच्या समस्येमुळे अनेक शेतकरी सिंचनाच्या सुविधांसाठी मोठा खर्च करण्यास भाग पडतात. यामुळेच शासनाने शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन पद्धती, पीव्हीसी पाइपसाठीही अनुदान देण्याची तरतूद केली आहे. मागील पाच वर्षांत शासनाच्या मदतीने हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळाली आहे. आता बोअरवेलचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

 

आधारकार्ड

जातीचा दाखला

उत्पन्न प्रमाणपत्र

सातबारा आणि आठ-अ उतारा

दारिद्र्यरेषेच्या खालील (BPL) कार्ड

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र

संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र

ग्रामसभेचा ठराव

जागेचा फोटो

पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)

५०० फूट अंतरावर कोणतीही विहीर नसल्याचा दाखला

अर्जदाराने हे सर्व कागदपत्रे अर्ज मंजुरीनंतर संबंधित विभागाकडे सादर करावी लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button