Akkalkot : खेडगी महाविद्यालयाचे डॉ गणपतराव कलशेट्टी व नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्या संकल्पनेतून नगरपरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना कलिंगडाचे वाटप

अक्कलकोट (प्रतिनिधी): सी बी खेडगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ गणपतराव कलशेट्टी यांच्या नियोजनबद्ध प्रेरणात्मक मार्गदर्शनाने व नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्या विशेष सहकार्याने अक्कलकोट शहरातील नगरपरिषद शाळा नंबर १ व २ (कन्नड माध्यम) येथे मोफत कलिंगड वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विशेषता अक्कलकोट तालुक्यातील एक आदर्श प्रगतशील शेतकरी श्री विजयकुमार पाटील व शेतकरी श्री राजू गोगावे शेतकरी श्री बोधले काका सहकार्यातून मोफत कलिंगड वाटप उपक्रमाची सुरुवात झाली.


सुरुवातीस शेतकरी बांधवांच्या शुभहस्ते उपस्थित विद्यार्थी वर्गांना मोफत व मुबलक प्रमाणात कलिंगड या फळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक काशिनाथ पोतदार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शेतकरी बांधवांनी शेती क्षेत्रात करीत असलेले परिश्रम व शेत उत्पादन आणि विपणन व्यवस्था यांचा समन्वय साधताना अनेक आर्थिक अडचणी येत अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकरी बांधवाने कलिंगड या फळाची विक्री न करता विद्यार्थी वर्गाना मोफत देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निश्चितच ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने खरोखरच अभिनंदन व गौरवास्पद अशी आहे. भविष्यात अशा अनेक संधी व मदतीचे उपक्रम राबविण्यात येतील. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा सतत प्रयत्न करावेत.असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजक, कृषी अभ्यासक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी आपले विचार व्यक्त करताना “भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती , बळीराजा संस्कृती आणि प्रगत संस्कृती “म्हणून अभ्यासली जाते” भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी वर्गांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण जागतिक स्तरावर शेतकरी बांधवांचे वर्णन करताना “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे”अशा महत्वपूर्ण विधानातून शेतकरी वर्गांच्या कार्याचा गौरव केला जात आहे.आणि त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून अक्कलकोट तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी श्री विजयकुमार पाटील व श्री राजू गोगावे यांनी आपल्या श्रमातून उत्पादित केलेला कलिंगड या फळाची विक्री करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थी घेत असलेली शाळा व त्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची स्पर्धाशक्ती व विद्यार्थी वर्गांचा श्रमदान इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टीच्या प्रेरणेतून शेतकरी बांधवांनी मोफत कलिंगड वाटप चा अभियान सुरू करण्याची भावना बोलून दाखविली. व ते त्वरित उपक्रमातून अमलात आणली. अक्कलकोट शहरातील नगरपरिषद (कन्नड शाळा) क्रमांक एक व दोन येथे मोफत कलिंगड वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना मोफत कलिंगड वाटप या कार्यक्रमातून मिळणारा आशीर्वाद व शुभेच्छा बाजारात कलिंगड विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपेक्षा लाखो पटीने सर्वाधिक आहे. असे आनंददायी समाधानकारक मत व्यक्त केले. या गौरवास्पद उपक्रमा आयोजना निमित्त अक्कलकोट तालुक्यातील सर्व बांधवांकडून शेतकरी वर्गांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरीशंकर कोळी हे होते. त्याच वेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापिका एस एस शिवशरण मॅडम आणि हनुरे सर , लिंबीतोटे सर, कोरचगावकर सर, शालेय व्यवस्थापन समितीचे प्रमुख शिंगे मॅडम आणि पाटील मॅडम, कवटगी मॅडम, किरुणगी मॅडम पत्री मॅडम, श्री पत्री स्वामी काका इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित राहून शेतकरी बांधव व विद्यार्थी वर्गांना शुभेच्छा दिल्या. यासारख्या विविध उपक्रमातून शेतकरी बांधवांनी व पालकांनी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सतत आढावा घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच असे अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पालक वर्गानी नियमितपणे शाळेस भेटी द्याव्यात असे मत गौरीशंकर कोळी याने व्यक्त केले.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माळप्पा बंडगर व शिवू बंडगर काका आणि अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी महांतेश गद्दे व भागेश बंकलगी यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे आभार श्री. कोम्पा यांनी मानले.