ठळक बातम्या

श्री परमेश्वर विद्यावर्धक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , श्री एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी चे माध्यमिक शालांत(SSC), उच्च माध्यमिक शालांत(HSC) परीक्षेत घवघवीत यश

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रशालेचा दहावी (SSC) चा निकाल 97.19% लागला. कु. इक्रा बागवान हिने 94.60% घेऊन प्रथम क्रमांक,कु.धनश्री लगशेट्टी व अमरनाथ गड्डद दोघांनीही 94% मिळवून दुसरा तर दिपाली सूर्यवंशी हिने 93% मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचा(HSC) विज्ञान शाखेचा 100%, वाणिज्य शाखेचा 87.87% तर कला शाखेचा 82.15% लागला आहे. विज्ञान शाखेतून बटगिरी प्रज्वल याने 77.50% घेऊन प्रथम क्रमांक पाटील अनिकेत 77. 17% घेऊन द्वितीय क्रमांक तर कु.आमटे महेक 68.83% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. वाणिज्य शाखेतून चव्हाण एस व्ही याने 58.33 % घेऊन प्रथम क्रमांक, कु.मुल्ला एस एम व कु. सलगरे बी एम यांनी 57% घेऊन द्वितीय क्रमांक , कु. मुर्डी सिमरन 54.17% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. कला शाखेतून कु. सलगरे गोकर्णा हिने 60 % घेऊन प्रथम क्रमांक, हंद्राळे अशितोष 59.17% घेऊन द्वितीय क्रमांक, कु. कोंडे विद्या 57.33% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

 परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button