अध्यात्म व भावभक्तीच्या परिभाषेचे महत्व समजण्यासाठी स्वामी भक्ती गरजेची – केदार दिघे
केदार दिघे व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

अध्यात्म व भावभक्तीच्या परिभाषेचे महत्व समजण्यासाठी स्वामी भक्ती गरजेची – केदार दिघे

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२६/०३/२०२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचा मी एक निस्सीम भक्त आहे. आज माझ्यासह लाखो स्वामी भक्त या देशात या महाराष्ट्रात आहेत. अनेक संतांनी व श्री स्वामी समर्थांसारख्या थोर दैवतांनी अनेकांना भक्तीमार्ग दाखविण्यासाठी केलेल्या कतृत्वप्रणालीमुळे व स्वामींच्या अस्तित्वतेच्या प्रचितीमुळे भारतीय संस्कृतीच्या नितीमुल्यांची दखल जगात घेतली जाते, कारण भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून भाविकांना सन्मार्ग स्वामी भक्तीतून निर्देशीत होत आहे. या निर्देशीत मार्गातून आध्यत्म व भावभक्तीच्या परिभाषेचे महत्व स्वामी भक्तीने समजते,
म्हणून अध्यात्म व भावभक्तीच्या परिभाषेचे महत्व समजण्यासाठी येथील श्री.वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांची भक्ती गरजेची
असल्याचे मनोगत मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त गव्हर्मेंट लीडर केदार दिघे
यांनी व्यक्त केले. ते नुकतेच आपल्या कुटूंबासमवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केदार दिघे व त्यांचे कुटूंबीय
अश्विनी दिघे, कुंदन दिघे, अथर्व दिघे यांचा
श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना केदार दिघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, गिरीश पवार, चंद्रकांत सोनटक्के, सागर गोंडाळ,
विपुल जाधव, ज्ञानेश्वर भोसले, प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीकांत मलवे, रवी मलवे आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – केदार दिघे व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
