*वीटभट्टी शाळेच्या शिक्षिका श्रीमती स्वाती साहेबराव पाटील गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*
पुरस्कार

*वीटभट्टी शाळेच्या शिक्षिका श्रीमती स्वाती साहेबराव पाटील गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*

जालना: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीटभट्टी येथील आदर्श उपक्रमशील शिक्षिका स्वाती साहेबराव पाटील यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे मार्फत दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार रविवार दि.23 मार्च रोजी जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयात एका विशेष कार्यक्रमात माजी मंत्री आमदार श्री.अर्जुनजी खोतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार नारायण कुचे,माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, गटशिक्षणाधिकारी भरत वानखेडे ,रवि,जोशी शिक्षक परिषदचे जिल्हा नेते मंगेशजी जैवळ आदींची उपस्थिती होती.
हा पुरस्कार स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक, मदतनीस, नातेवाईक इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
