खेडगी परिवाराची ६१ वर्षांची परंपरा कायम ; नवरात्र उत्सवानिमित्त ९ टन गोडेतेल अल्पदरात वाटप
नवरात्र विशेष

खेडगी परिवाराची ६१ वर्षांची परंपरा कायम ; नवरात्र उत्सवानिमित्त ९ टन गोडेतेल अल्पदरात वाटप
अक्कलकोट, दि. २२ – येथील खेडगी परिवाराच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोमवारी घटस्थापनेसाठी लागणारे तब्बल ९ हजार लिटर (सुमारे ९ टन) गोडेतेल नागरिकांना अल्प दरात वाटप करण्यात आले. शहर व तालुक्यातील हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
दानशूर चनबसप्पा खेडगी व नंतर शिवशरण खेडगी यांनी सुरु केलेली ही परंपरा आज तब्बल ६१ वर्षे अखंडितपणे सुरू आहे. सदर उपक्रम अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी परिवार पुढे नेत आहेत. दिवसभर अल्प दरातील गोडेतेल घेण्यासाठी नागरिक, विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती. शिस्तबद्ध रांगेत उभे करून वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात तुप चौकातील मंडपात श्री स्वामी समर्थ महाराज तसेच दिवंगत चनबसप्पा खेडगी, नीलव्वाबाई खेडगी, शिवशरण खेडगी यांच्या प्रतिमेचे पूजन करून बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकूड, ज्येष्ठ संचालक अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, चन्नवीर खेडगी, स्तुती खेडगी, दिनेश धाराशिवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तेल वाटप यशस्वी करण्यासाठी भारत पाटील, मुत्तण्णा वाले, गुरुनाथ कलशेट्टी, सिध्दाराम इचगे, शिवानंद बाळीकाई, राजशेखर लोकापूरे, दत्तात्रय कलशेट्टी, सिध्दाराम अरबाळे, बाबूराव बोलदे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, शिवानंद भासगी, विजयकुमार यारोळे, परमेश्वर कलबुर्गी, अंबादास खरटमल, प्रशांत कडबगांवकर, हणमंत कोळी, विजयकुमार माळाबागी, सुधीर राठोड, संतोष कुंभार यांच्यासह खेडगी मित्रमंडळाचे सहकार्य लाभले.
याशिवाय खेडगी परिवाराबरोबरच सिद्धेश्वर बँकेचे संचालक बसवराज माशाळे, बसवराज गोरे, स्व. चंद्रसेन राठोड यांच्या स्मरणार्थ शैलेश राठोड, मुन्ना राठोड, विकास राठोड, लखन राठोड, मल्लेशप्पा गोरे परिवार यांनीही ऐतिहासिक कारंजा चौक व बसस्थानक परिसरात नागरिकांना अल्प दरात गोडेतेल वाटप केले. तसेच ऐतिहासिक कारंजा चौक नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधीर माळशेट्टी, केदार माळशेट्टी परिवार यांच्या वतीने घट साहित्य वाटप करण्यात आले.
चौकट
“शहर व तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आणि आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो, त्याच उद्देशाने असे रक्तदान शिबिर, कोजागरी पौर्णिमेला श्रीक्षेत्र तुळजापुरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोफत बससेवा, गोरगरिबांना विविध प्रकारच्या मदतीचा हात देऊन आधार दिला आहे. आजोबानंतर वडिलांनी चालू केलेली जनसेवेची परंपरा आम्ही अखंडितपणे चालू ठेवणार आहोत.”
– बसलिंगप्पा खेडगी,
चेअरमन, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी.