गावगाथाठळक बातम्या

Shikhar Dhawan retirement: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि दिग्गज फलंदाज शिखर धवन याची क्रिकेटच्या सर्व फाॅर्मेट मधून निवृत्ती

(प्रतिनिधी ): भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर तथा दिग्गज क्रिकेटपटू  शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय धवनने आपल्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केला आहे.

शिखर धवनने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

 

शिखर धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 सामने खेळलेले आहेत. 38 वर्षीय शिखर धवन साधारण 2022 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता.

 

धवनने इंडियन प्रिमियर लिगमध्येही धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. तो पंजाब किंग्ज या संघाचा कर्णधार राहिलेला आहे.आयपीएलमध्ये  एकूण 6769 सामने खेळले. आयपीएलमध्ये त्याने एकूण 51 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावलेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button