राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या पच्छिम महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रकाश मंगाणे यांची निवड…
निवड नियुक्ती

राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या पच्छिम महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रकाश मंगाणे यांची निवड…

पुणे/सोलापूर — राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये तरुण उद्योजक व दांडगा जनसंपर्क असलेले युवक प्रकाश मंगाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली असून पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी निश्चित पणे तरूण व नवीन उद्योजकांना लाभदायक ठरणार असल्याने प्रकाश मंगाणे यांचे सर्व उद्योजक क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.

यावेळी प्रकाश मंगाणे बोलताना म्हणाले, भविष्यात येणारा काळ हा उद्योग क्षेत्रात क्रांती घडविणार असणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून देण्यात आलेली जबाबदारी मी निश्चित पणे निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून तरुण उद्योजकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.


यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.
