गावगाथा

काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर, सोलापुरातून प्रणिती शिंदे रिंगणात

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर, सोलापुरातून प्रणिती शिंदे रिंगणात

HTML img Tag Simply Easy Learning    

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. “मी पक्षाचे आभार मानते. ही लोकशाहीसाठीची लढाई आहे”, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.
पुण्यातून रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत होणार
काही दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणितीला दिल्लीत पाठवा. सोलापूरचे नाव पुन्हा एकदा देश पातळीवर गाजवू द्या, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून सोलापूरचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. शिवाय कोल्हापुरातूनही अद्याप भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहू महाराज कोणाकडून लढणार यावरुन महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच दिवसांपासून खल सुरु होता. मात्र, आज अखेर ते काँग्रेसच्या हात या चिन्हावर लढणार आहेत, हे निश्चित झाले आहे. दरम्यान, पुण्यातून रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार हे निश्चित झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार कोणते ?
नंदुरबार -गोवल के पाडवी
अमरावती -बलवंत वानखेडे
नांदेड – वसंतराव चव्हाण
पुणे – रवींद्र धनगेकर
लातूर – शिवाजीराव काळगे
सोलापूर प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू शहाजी छत्रपती

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button