श्री.स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त श्री.वटवृक्ष मंदिरातील तयारी पूर्ण.
दर्शन रांगेत कापडी मंडपाची व्यवस्था.

श्री.स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त श्री.वटवृक्ष मंदिरातील तयारी पूर्ण.

दर्शन रांगेत कापडी मंडपाची व्यवस्था.

वटवृक्ष मंदिरास आकर्षक फुलांची सजावट.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.२९/०३/२०२५) श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दि.३१ मार्च रोजी मोठ्या भक्ती भावात संपन्न होत आहे. श्री स्वामी समर्थांच्या या प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदीरातील जन्मसोहळा पाळणा कार्यक्रम इत्यादी प्रमुख धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी व वटवृक्ष निवासी श्री.स्वामींच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येण्याची शक्यता आहे. सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी दर्शनाच्या सोयीकरिता व स्वामी भक्तांच्या सेवेत मंदिर समितीच्या वतीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन मंदिर समितीच्या वतीने परिपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. श्री.स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगून मंदिर गाभारा परिसरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी स्वामींच्या प्रकटदिना दिवशी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. यंदाही संभाव्य होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिरा बाहेरील परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण होणेकरिता दर्शन रांगेत कापडी मंडपाची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी दक्षिण महाद्वार येथील पादत्राण कक्षासह मुरलीधर मंदिर समोरील परिसरातही पादत्राण कक्ष चप्पल स्टॅंडची सोय करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर पुरुष व महिला भक्तांना वेगवेगळ्या रांगेतून दर्शनाला सोडण्यात येणार आहे. वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांचे स्वामी दर्शन सुलभ होईल असा विश्वास मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केला आहे. गुढीपाडवा व श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर गाभाऱ्यास पुण्यातील स्वामीभक्त भागवत शिवतारे व अजय भोसले यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील प्रवचनकार पंडीत महेश राजोपाध्ये यांची प्रवचन सेवा दुपारी ४ ते ६ या वेळेत तसेच स्वामी प्रकटदिन रोजी पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची भक्ती संगीत सेवा दुपारी २ ते ४ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न होणार आहे अशीही माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी देऊन सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या दर्शनाचा, भोजन महाप्रसादाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.
