जॉय ची उल्हासनगर शाळेत २०० विधार्थ्यांना किराणा किट, संगणक आणि शाळा डेव्हलपमेंट फंड साठी मदत
सामाजिक बांधिलकी

जॉय ची उल्हासनगर शाळेत २०० विधार्थ्यांना किराणा किट, संगणक आणि शाळा डेव्हलपमेंट फंड साठी मदत

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

जॉय ऑफ गिविंग ग्रुप मुंबई च्या वतीने दिनांक २९ मार्च २०२५ रोजी उल्हासनगर पूर्व ठाकूर जागृती शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील २०० विद्यार्थ्यांना किराणा किट, संगणक आणि शाळा डागडुजी साठी दहा हजार रुपये देऊन सहकार्य करण्यात आले.उल्हासनगर गायकवाड नगर नंबर ५ येथील वस्तीत ही शाळा असून सेवानिवृत्त शिंदे दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा साहिल शिंदे अत्यंत प्रतिकूल बिकट अवस्थेत ही शाळा चालवित आहेत.या शाळेत गरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची मुले शिकत आहेत. यावेळी शिक्षक नेते जनार्दन जंगले सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतें.जॉय चे काम चांगले असून गोर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि किराणा सामान वितरीत करण्याचे काम अनेक वर्षांपासून संस्था करीत असून आतापर्यंत हजारो विद्यार्थी व वृद्धना मदत पोहोचली आहे.सामान वितरीत करण्यासाठी चंद्रशेखर सावंत, भूषण मुळे, किरण मुणगेकर, अविनाश करगुटकर, विजय फणसेकर, सुनील चव्हाण, सुनील वडतकर, जनजागृती संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, गणेश हिरवे आदी कार्यकर्ते वेळात वेळ काढून उपस्थित होते.जॉय चे किरण मुणगेकर कुटुंबियांनी शाळेला संगणक भेट दिलं.मोठ्या प्रमाणावर मदत मिळाल्याने जॉय संस्थेचे आभार शाळेचे मुख्याध्यापक रामाने सर यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत मॅडम यांनी केले.
