श्री.वटवृक्ष मंदिरात १४७ व्या श्री.स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पूजन.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश इंगळेंच्या हस्ते पत्रिकेचे पुजन.

श्री.वटवृक्ष मंदिरात १४७ व्या श्री.स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पूजन.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश इंगळेंच्या हस्ते पत्रिकेचे पुजन.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.३०/०३/२०२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४७ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक २६ एप्रिल रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन मंदार महाराज पुजारी यांच्या विधीवत मंत्रोच्चारात,
श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या शुभहस्ते श्रींच्या चरणी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे पुजारी मोहन महाराज पुजारी, अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, व्यंकटेश पुजारी, ओंकार पाठक, मोहन सोहनी, डॉ.आदीत्य कोतवाल, विलास कुलकर्णी, नारायणराव कुलकर्णी, निनाद सोलापूरकर, गौरव कुलकर्णी आदींसह मान्यवरांना कार्यक्रम पत्रिका देवून उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. यानंतर श्री स्वामी समर्थांची नैवेद्य आरती संपन्न झाली. आरती नंतर गुढीपाडव्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. तत्पूर्वी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी प्रथमेश इंगळे यांचा शाल पुष्पगुच्छ प्रसाद देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व मान्यवरांसह उपस्थितांनीही प्रथमेश इंगळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी
बाळासाहेब घाटगे, बंडेराव घाटगे,
प्रा.मधुकर जाधव, प्रा.शिवशरण अचलेर,
शिवपुत्र हळगोदे, प्रकाश सुरवसे, अमर पाटील, प्रसाद पाटील, अविनाश क्षीरसागर, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद सोनार, संतोष पराणे, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, प्रविण घाटगे, गणेश इंगळे, नागनाथ गुंजले, महेश मस्क्रले आदींसह मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – कार्यक्रम पत्रिकेचे पूजन करताना महेश इंगळे, अमोलराजे भोसले, मंदार महाराज, संपतराव शिंदे व इतर दिसत आहेत, तर प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना अमोल राजे भोसले, महेश इंगळे व मान्यवर दिसत आहेत.
