*श्री राम जन्मले गं बाई…. श्री राम…! श्रीक्षेत्र अयोध्या निवासी श्री राम की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रामनवमी उत्सव साजरा*
दिन विशेष

*श्री राम जन्मले गं बाई…. श्री राम…! श्रीक्षेत्र अयोध्या निवासी श्री राम की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रामनवमी उत्सव साजरा*

अक्कलकोट : प्रतिनिधी*
*श्री राम जन्मले गं बाई…. श्री राम…! श्रीक्षेत्र अयोध्या निवासी श्री राम की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रविवारी श्रीं राम नवमी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा व न्यासाचे विश्वस्त अलकाताई जन्मेनजराजे भोसले, विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीं राम नवमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात श्री राम नवमी निमित्त पाळणा कार्यक्रम रविवारी दुपारी १२ वा. संपन्न झाला. या प्रसंगी न्यासाच्या विश्वस्त अलकाताई जन्मेनजराजे भोसले, विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले,छाया पवार,रुपा पवार,स्वाती निकम,कु. तेजस्विनी अमोलराजे भोसले, राजश्री माने यांच्या व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. पाळणा गीताबरोबरच मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. राम नवमी निमित्त सकाळच्या दरम्यान महाप्रसादालयात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. चांदीच्या पाळण्यासह श्रींच्या पूजेच्या ठिकाणास आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सौरभ मोरे, मनोज निकम, निखील पाटील, अतिश पवार, गोटू माने, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, संजय गोंडाळ, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, गोविंदराव शिंदे, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
