गावगाथाठळक बातम्या
LPG gas cylinder : घरगुती गॅस सिलिंडर महागला ; सर्वसामान्यांना सरकारचा ‘जोर का झटका’
पुणे (प्रतिनिधी): सर्वसामान्यांना ‘जोर का झटका’ देणारी बातमी आहे. पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे.

सध्या मुंबईसह आसपासच्या शहरात घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 802 रुपये आहेत. दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एका सिलेंडरसाठी 825 रुपये मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू होणार आहे.
