गावगाथा

बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’ पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र मंडळाचा उपक्रम……….

आतापर्यंत एकूण २७३ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या आहेत

बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’
पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र मंडळाचा उपक्रम……….

सनई-चौघडयांच्या ‘मंगल’सूरात हजारो व-हाडी मंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी येथे गुरूवारी, सायंकाळी ७ वाजून ३२ मिनिटांच्या मुहूर्तावर एस.व्ही.सी.एस.प्रशालेच्या प्रागणांत आठ जोडप्यांच्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठया’ बांधण्यात आल्या.यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नव वधू-वरांस शुभाशिर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्यावतीने दरवर्षी सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात येते.यावेळी व-हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रसह सौभाग्य अंलकार,शालू तसेच नवरदेवास सफारी पोषाखसह हळदीचे कपडे देण्यात आले.यावेळी वधू-वरांचे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आले.त्यानंतर आकर्षक मांडवात धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला.

माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे,र सुदीप चाकोते, केदार उंबरजे, रमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग,
प्रा.राज साळुंखे,संजय स्वामी(तांदूळवाडी) माजी सरपंच नागराज पाटील , फक्रीदिन नदाफ, आदी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार या विवाह सोहळयांचे संयोजक धनेश आचलारे यांनी केले.या कार्यक्रमास बोरामणीसह विविध गावचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायतीचे सदस्य,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे आजी-माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी आचलारे मित्र परिवार व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.आतापर्यंत एकूण २७३ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या आहेत.हा विवाह सोहळा अप्पासाहेब हलसगे,गौस शेख,
रफिक मुजावर, प्रवीण गुंजले,चन्नप्पा मटगे, बाबूराव वडजे, राजकुमार हलसगे,
लक्ष्मीकांत आचलारे,वैभव भाले, त्र्यंबकेश्वर विभूते, धनेश शेळगे,सागर आचलारे, मल्लिनाथ रे.हुक्करे, चंद्रकांत बिराजदार, श्रीकांत बिराजदार,पप्पू हुक्केरी, नागनाथ हुक्केरी, चिदानंद हुक्केरी, सुनील आचलारे, मनोज कोरे,संजय पाटील,पापा पाटील,बाबू वडजे,केदार हेबळे, सिध्दू माळी,श्रीशैल पुकाळे, सिताराम पाटील, सचिन स्वामी , विठ्ठल साखरे, संजय पटणे,
यांच्यासह आचलारे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.सूत्रसंचालन अरूंधती शेटे व मंगेश लामखाणे यांनी केले.

अकरा हजाराची ठेव
या विवाह सोहळयात सहभागी झालेल्या वधू-वरांस पहिली मुलगी झाल्यास त्या मुलींचे नांवे धनेश आचलारे यांच्यावतीने ‘मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कन्यारत्न’ योजनेतंर्गत त्या मुलींच्या नांवे अकरा हजाराची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे.अठरा वर्षानंतर वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे

अशी माहिती धनेश आचलारे यांनी दिली..

सामाजिक ॠण फेडण्याचे कार्य…
महागाई,दुष्काळी परिस्थिती आणि कौटुंबिक अडचणीमुळे आज विवाह कार्य पार पडणे कठीण जात आहे.नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन धनेश आचलारे यांनी गोर-गरिब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देत आहेत.खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद आहे.आचलारे यांच्याकडून सामाजिक ॠण फेडण्याचे काम होत आहे असे गौरवोद्गार काशीपीठाचे जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले.
प्रेरणादायी उपक्रम..
समाजात अलीकडच्या काळात नेहमी महागाई,दुष्काळी परिस्थिती असते.त्यामुळे गोर-गरिब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाहास अडचणी येतात.त्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाची समाजाला नितांत गरज आहे.ती गरज धनेश आचलारे मित्र परिवारांतर्फे पूर्ण होत आहे.ही बाब कौतुकास्पद आहे.त्यांच्या पाठीशी आपण यापुढील काळात ही कायम राहू.अशी ग्वाही माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी येथे बोलताना दिली…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button