गावगाथा

ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रेची मानाच्या नंदीध्वजाच्या भव्य मिरवणुक रथोत्सव संपन्न

शोभेच्या दारूच्या आतिषबाजीने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

अक्कलकोट : हर हर महादेव श्री मल्लिकार्जुन महाराज की जय…. या जयघोषात तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रेची मानाच्या नंदीध्वजाच्या भव्य मिरवणुक रथोत्सवाने सांगता करण्यात आली. यावेळी मल्लिकार्जुन महाराज की जयच्या जयघोषात सारा आसमंत दुमदुमून गेला होता. शोभेच्या दारूच्या आतिषबाजीने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा सांगता भक्ती भावाने साजरी झाली. तीर्थक्षेत नगरी भल्या पहाटेच घरोघरी सडा रांगोळी चालू होती. एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस यात्रेतील प्रमुख पाच नंदीध्वजांची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. पाटील, नंदीकोले, लिंबीतोटे, आडवीतोटे, रोडगे आधी पाच नंदीध्वजांचे मानकरी आहेत. सकाळी श्रींना अभिषेक, नैवेद्य, आरती, दुपारी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य नंदीध्वजाची मिरवणूक निघून सायंकाळी सूर्यास्तावेळी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ पोहोचली. मिरवणुकीत बाराबंदी, पांढरा पोशाख घातलेले सदभक्तांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नंदीध्वजांची प्रदक्षिणा मंदिरास झाली. विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नी. प्र. बसवलिंग महास्वामी यांच्या हस्ते पूजन करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
मंदिर, बसस्थानक परिसर भाविकांनी फुलला होता. बाल गोपाळांचे छोटे नंदीध्वज, मोठे नंदीधज, विद्युत रोषणाईने सज्ज, शोभेच्या दारूची भव्य आतिषबाजी याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नंदीध्वजाचे मानकरी व त्यांच्या सर्व सहकारी व भाविकांना समर्थ चौक येथे याळवार परिवाराकडून व शहरातील विविध मार्गावर विविध ठिकाणी विविध प्रकारच्या मठ्ठा, सुगंधी दूध, खजूर, सोनपापडी, लाडू, पाणी बॉटल आधीचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अनछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोले, राजशेखर हिप्परगी, प्रथमेश इंगळे, श्री स्वामी समर्थ आणि छत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी,शिवशरण जोजन, मिलन कल्याणशेट्टी, माझी जि प सदस्य मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिद्धे, अविनाश मडिखांबे, प्रशांत लोकापुरे, बसवराज माशाळे, राजकुमार नागोरे, स्वामीनाथ हिप्परगी, श्रीकांत झिपरे, रमेश कापसे, मल्लिनाथ बहिर्जी, दयानंद बिडवे, शिवराज स्वामी, अरुण लोणारी, महेश शावरी, अशपाक बळवर्गी,
राजशेखर उमराणीकर, नीलकंठ कापसे, सुनील गोरे, रुद्रया स्वामी, यांच्यासह हजारो मल्लिकार्जुन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button