माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन
माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे वटवृक्ष मंदिरात प्रकाशन

माणुसकी फाऊंडेशन निराधारांचे आधारवड – महेश इंगळे

माणुसकी फाऊंडेशनच्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले मनोगत

SHRISHAIL GAVANDI

स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीच्या नागरिकांच्या अंतरात्म्यातच सेवाभावी वृत्ती दडलेली आहे. या पार्श्वभूमीवर येथील माणुसकी फाऊंडेशन चे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून या सदस्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब व निराधारांना मोठे आधार दिलेले आहे. या माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून निराधारांना मोठे आधार लाभलेले आहे. यानिमीत्ताने माणुसकी फाऊंडेशन हे निराधारांचे आधारवड म्हणून उदयास आले असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. आज माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सन २०२३ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी अक्कलकोट मधील माणुसकी फाऊंडेशन ही संघटना अत्यंत तळमळीने कार्य करणारी संघटना आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा, रस्त्यावरील निराधार यांना हिवाळ्यात माणुसकीची उब म्हणून मायेच्या वस्त्राचे अच्छादन, गोरगरिबाच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, दिवाळी फराळ वाटप, कोविड लॉकडाऊन काळात अन्नदान, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अन्नदान, मदत कार्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य,
इत्यादी उपक्रम अगदी उत्साहाने राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अनेक निराधारांना गोरगरिबांना झालेला आहे. या संस्थेचे सर्व सदस्य कोणीही बेरोजगार नसून सर्व स्वयंसेवक आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून या माणुसकी फाऊंडेशनचे कार्य अगदी उत्साहाने करीत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आज नूतन वर्षाची भेट म्हणून सन २०२३ या नुतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून माणुसकी फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी ही जोपासलेली आहे. त्यांच्या यापुढील सामाजिक कार्यासही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे नेहमीच सहकार्य असेल असेही प्रतिपादन महेश इंगळे यांनी याप्रसंगी केले. यावेळी माणुसकी फाऊंडेशनचे सदस्य आशिष हुंबे, आकाश शिंदे, देविदास गवंडी, संजय बडवे, अनंत क्षीरसागर, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, श्रीकांत मलवे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार व माणुसकी फाऊंडेशनचे अन्य कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष मंदिरात माणुसकी फाऊंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.